जिल्हयात 4 जानेवारीला 144 कलम लागू

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला
वर्धा, दि.31 : महामहिम उपराष्ट्रपती 4 जानेवारी रोजी जिल्हयाचे दौ-यावर येत आहे. त्या अनषंगाने 3 जानेवारीच्या मध्यरात्रीपासुन 4 जानेवारीच्या मध्यरात्री पर्यंत जिल्हयात कलम 144 लागू राहणार आहे.
या दरम्यान सुरक्षेच्या अनुषंगाने ड्रोन, रिमोट कंन्ट्रोल, मायक्रो लाईट एअर क्रॉप्ट, एरिअल क्षेपणास्त्र किंवा पॅरा ग्लॉयडर्स या साधनावर बंदी राहणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी कळविले आहे. या प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत पोलिस विभागास कळविण्यात आले आहे.