भाजयुमो तर्फे विद्यापीठ विधेयकाची होळी

 

प्रतिनिधी // सारंग नेवरे

महाविकास आघाडी सरकार स्वतःच्या मनमर्जीने ने अधिवेशनात विद्यापीठ विधेयक पारीत करुन घेतल्या च्या विरोधात भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री.वरुण पाठक यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विधेयका विरोधात आदोलन करून अनैतीक विधेयकाच्या प्रती जाळुन होळी करुन शासन निर्णयाचा निषेध करण्यात आला. हे काळे विधेयक राज्य सरकारने त्वरित मागे घ्यावे या मागणीचे मा.जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील कठाळ प्रवीण पवार,वैभव तिजारे, प्रसाद फटिंग,कृष्णा जोशी,अविनाश बाभुळकर,विशाल उराडे,रितेश साठोणे,प्रिया ओझा,मयुर पोकळे,रोशन मानमोडे,अमोल गवळी, अतुल देशमुख, वर्धा शहर युवा मोर्चा अध्यक्ष मोहित उमाटे,करण गेलानी,अरविंद गोटेकर, विवेक कुबडे,कुणाल कोल्हे,शुभम पांडे,अनिकेत माळोदे,अभय धनविज, बादल झामरे,कुणाल दूरतकर,शुभम खंडारे,दिपक उगेमुगे,महामंत्री सौरभ देशमुख, अक्षय बैस्वार, सुमित वैद्य, सलमान पठाण,निशांत पिंपळापुरे, प्रज्वल कावलकर, मनोज तळवेकर,जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.