कोरोणा विषाणुच्या पार्श्नभुमीवर येणाऱ्या नवीन वर्षाकरीता पोलीस घटक सज्ज

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

कोरोणा विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन हा नवीन कोरोणा विषाणुचा प्रकार आढळुन आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणुचे संक्रमण सामान्य नागरीकांमध्ये / रहिवास्यांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणुन मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी ३१ डिसेंबर २०२१ (वर्ष अखेर) व नुतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याचे दृष्टीने महाराष्ट्र शासनाने क्रमांक – आरएलपी-१२२१/प्र.क्र.२८१/विशा-१ ब, दिनांक २९ डिसेंबर २०२१ चे परीपत्रकान्वये मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाचे वरील परिपत्रकानुषंगाने या वर्षी ३१ डिसेंबर २०२१ (वर्ष अखेर) व नुतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याचे दृष्टीने वर्धा जिल्हा पोलीस दल सज्ज आहे. जिल्ह्यात ३४ ठिकाणी नाकेबंदी व ६५ फिक्स पॉईंट नेमले आहेत. सर्व पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस गस्त व हॉटेल, लॉजेस, पर्यटन स्थळे, सभागृह चेक करणे तसेच अवैध दारु, अंमली पदार्थ यांचेवर कारवाई करणेकरीता वेगवेगळी पोलीस पथके तयार करण्यात आलेली आहे.
वर्धा पोलीस घटकातर्फे मा. पोलीस अधीक्षक – १, मा. अपर पोलीस अधीक्षक – १, उपविभागीय पोलीस अधिकारी – ४, पोलीस निरीक्षक – २१, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक – ३८ तसेच पोलीस अंमलदार – ३३९ असे अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
नववर्ष स्वागताच्या निमित्याने नागरीकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच राहुन साधेपणाने साजरे करावे. महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकानुसार ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तरी जिल्ह्यात नुतन वर्ष स्वागत व जुन्या वर्षाचे निरोपासाठी ५ पेक्षा जास्त इसम एकत्र जमल्यास त्यांचेवर कारवाई करण्यात येईल.
नुतन वर्ष, २०२२ चे स्वागताकरीता रस्त्यावर, पर्यटन स्थळावर तसेच सार्वजनिक ठिकाणावर वर्धा जिल्हा पोलीस दलाकडुन विशेष लक्ष देवुन बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
नुतन वर्षाचे स्वागताचे निमीत्याने कोणत्याही प्रकारे धार्मिक / सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नये.
फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये तसेच ध्वनीप्रदृषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
तरी वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते कि, नागरीकांना शासनाने या वर्षी ३१ डिसेंबर २०२१ (वर्ष अखेर) व नुतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याचे दृष्टीने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच दारु पिऊन वाहन चालविणे, दारु पिऊन सार्वजनिक ठिकाणी वावरणे असे करणाऱ्यांवर कायदेशिर कारवाई केली जाणार आहे. तरी सर्व नागरीकांनी आपआपले घरीच नुतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करावे.