महिलेचा गळफास घेऊन आत्महत्या

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

आर्वी येथील गुरूजी मठा जवऴ
नेताजी वॉर्ड भागातील रहिवासी असलेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल बुधवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास घडली असून अश्विनी सुमित फसाटे (25) असे मृत महिलेचे नाव आहे. विवाहितेने गळफास घेतल्याचे लक्षात येताच आर्वी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी गुरूजी मठ नेताजी वॉर्ड भागातील घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आहे पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुलसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार भानुदास पिदुरकर उपनिरीक्षक योगेश चाहेर रंजित जाधव अनिल वैघ राहुल देशमुख अतुल भोयर अतुल गोटफोडे, वाढवे करीत आहे