चार नगर पंचायतीतील सर्वसाधारण प्रवर्गासाठी अंतिम आरक्षण जाहिर

 

जिल्हा प्रतिनिधी//उमंग शुक्ला

वर्धा, दि. 29:-विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन नागपूर यांनी वर्धा जिल्हयातील आष्टी, कारंजा, सेलू व समुद्रपूर नगर पंचायतीच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहिर केले असून या चारही पंचायतीमधील एकुण 14 प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
नगर पंचायत आष्टी प्रभाग क्रमांक 2,5,16 व 17 सर्वसाधारण प्रभागापैकी 2 व 16 महिला, कारंजा प्रभाग क्रमांक 4 व 5,6 व 8 प्रभागापैकी 6 व 8 महिला, सेलू प्रभाग क्रमांक 2,9,10 व 14 प्रभागापैकी 9 व 10 महिला, समुद्रपूर प्रभाग क्रमांक 7 व 8 प्रभागापैकी प्रभाग क्रमांक 7 सर्वसाधारण महिलासाठी असे एकुण 14 प्रभाग सर्वसाधारण पुरुष व सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा सह आयुक्त नगर विकास शाखा जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कळविले आहे.