महात्मा गांधी यांना अपशब्द बोलणाऱ्या कालीचरण महाराज वरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

दि.२८ / १२ /२०२१ रोजी वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटी, सर्व फ्रँटल सेल, विभाग वर्धा यांच्या वतिने मा. श्री. मनोजभाऊ चांदुरकर जिल्हा अध्यक्ष वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली कालिचरन महाराज या माथेफिरु यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींजी यांच्या बद्दल छत्तिसगढ येथिल रायपुर मधिल एका कार्यक्रमात अपशब्द बोलून त्यान्चा अपमान केला आहे. यासाठी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी वर्धा पोलिस अधीक्षक याना निवेदन देण्यात आले.आणि वर्धा जिल्हा हा संपुर्ण देशात गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो. यासाठी त्याच्यावर प्रामुख्याने याच वर्धा शहर पोलिस स्टेशनला देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी वर्धा जिल्हा अध्यक्ष मा.श्री.मनोजभाऊ चांदूरकर यानी जिल्हा पोलिश अधीक्षक मा.श्री.प्रशांत होळकर यांना केली आणि तसेच कालिचरन महाराज यांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी पन मागणी केली.
यावेळी वर्धा शहर पोलिस स्टेशन मधेपन पोलिस निरीक्षक मा.श्री. सत्यवीर बन्डीवार याना पन याच मागणीचे निवेदन देण्यात आले आहे .देशद्रोह व कठोरात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच कालिचरन महाराज यांच्या भाषणाची क्लिप पन निवेदन सोबत माननिय पोलिस निरिक्षक श्री.सत्यजित बंन्डीवार यानां देण्यात आली व गुन्हा दाखल करुन कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आणी कालिचरन मुर्दाबाद, धिक्कार असो धिक्कार, कालिचरण महाराज मूर्दाबाद, मुर्दाबाद अश्या घोषणा देऊन निषेध नोंदवला.
यावेळी प्रामुख्याने मा. श्री.मनोजभाऊ चांदूरकर जिल्हा अध्यक्ष वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटी, श्री.बाळाभाऊ जगताप वर्धा तालुका अध्यक्ष वर्धा, श्री. शब्बीर भाऊ पठाण जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक सेल, श्री.विजुभाऊ नरांजे जिल्हा सचिव, श्री.बाळाभाऊ माऊस्कर मा.प.समिती सद्दस्य,श्री.अमितभाऊ शेंडे जिल्हा अध्यक्ष ओबिसी विभाग, श्री. पूरुषोत्तम खासबागे ओबिसी विभाग प्रदेश सचिव, श्री.प्रफुल्ल गुल्हाने प्रदेश उपाध्यक्ष ओबिसी विभाग, श्री.समिरसिंग ठाकुर जेस्ठ कॉंग्रेस कार्यकर्ते, श्री. सुधाकर मेहरे मा.जिल्हा अध्यक्ष इन्टक कॉंग्रेस, श्री.अविनाश सेलुकर जिल्हा संघटक, श्री.अविनाश काकडे, अध्यक्ष किसान अधिकार आभियान, श्री. विशाल दाते कॉंग्रेस कार्यकर्ते, श्री. विशाल हजारे शहर उपाध्यक्ष ,वर्धा कॉंग्रेस कमिटी. श्री. श्रीकांत धोटे जिल्हा अध्यक्ष युवक इन्टक कॉंग्रेस, श्री.सादिक शेख शहर अध्यक्ष अल्पसंख्याक सेल, श्री.संजय बोरकर, श्री.रोहित ताजने, श्री.महेश मोरे सरपंच बोरगाव ( सा.) श्री. श्री.संतोष पवार युवक इंटक तालूका अध्यक्ष वर्धा,श्री. राजेश देवढे, श्री.नंदकुमार कांबळे जिल्हा प्रसिद्धी प्रमूख तथा वर्धा शहर अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग वर्धा आदी पदाधिकारी, कार्यकर्ते , कॉंग्रेस प्रेमी आदी उपस्तित होते.