राष्ट्रवादी च्या महिला नेत्या रोहिणीताई खडसे व मुक्ताईनगर श. अध्यक्षा निकिता पाटील याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या चा आर्वीत निषेध हल्लेखोरांवर कारवाई ची मागणी

 

जिल्हा प्रतिनिधी//उमंग शुक्ला

मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे , गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , रुपाली ताई चाकणकर महिला अयोग अध्यक्षां ना तहसीलदार आर्वी मार्फत निवेदन सादर

आर्वी :दिनांक 28/12/2021 रोज मंगळवारी विदर्भ संपर्क प्रमुख माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील व जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनात जडगाव जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्यां रोहिणी ताई खडसे यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे दिलीप पोटफोडे यांच्या पुढाकारात रॉ. कॉ च्या महिला आघाडी, रेखा वानखेडे, प्रमिला हत्तीमारे, माधुरी सपकाळ, भारती पोटफोडे, शांता इरपाचे सोनाली चिंधेकर, अर्चना टिपले यांच्या नेतृत्वात, आक्रमक होत तीव्र संताप व्यक्त करत खालील आशयाचे, निवेदन तहसीलदार आर्वी मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याच्या महिला अयोग अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांना सादर करण्यात आले यात जडगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर च्या महिला शहर अध्यक्षा निकिता ताई पाटील यांच्या घरावर दोन दिवसापूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता याची माहिती मिळताच राष्ट्रवादी कॉ च्या महिला च्या नेत्यां रोहिणी ताई खडसे या त्यांना धीर देण्यासाठी पोहचल्या व मुक्ताईनगर ला पोलीस कम्प्लेंट दाखल केली त्यांनतर लगेंच आज रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर दगड फेक करत अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी वर्धा महिला आघाडी च्या वतीने तीव्र निषेध नोंदवत कठोर कारवाई ची मागणी केली आहे या वेळी प्रामुख्याने, दिलीप पोटफोडे, रॉ कॉ वर्धा जिल्हा, वि स अध्यक्ष गोपाल मरस्कोल्हे,कमलेश चिंधेकर, रणजित पोटफोडे,राजू बोरकुटे, वासुदेव सपकाळ, आदर्श वानखेडे, दीपक बेंडे, राजू बेंडे, सुरेंद्र वाटकर, शंकरराव हत्तीमारे, जयंतराव गभणे, सिद्धांत कळंबे, अझहर खान, बादल काळे, प्रज्वल उईके व कार्यकर्ते उपस्थित होते याची प्रतिलिपी,
प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवली असून, माहितीस्तव विदर्भ संपर्क प्रमुख सुबोध मोहिते पाटील व जिल्हाध्यक्ष वर्धा सुनील राऊत यांना सुद्धा प्रति देण्यात आल्या आहेत