पॅरामेडिकल (dmlt)कॉलेज गडचिरोली ची तात्काळ चौकशी करून कॉलेज ची मान्यता रद्द व जबाबदार लोकांवर कारवाही करा अन्यथा तीव्र आंदोलन छेळू;भ्रष्टाचार विरोधी जण आंदोलन

 

 

जिल्हा प्रतिनिधी // कृनाल राऊत

सविस्तर वृत्त सदर निवेदनातून असे म्हटले आहे की

गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली तालुक्यात पटेल मंगल कार्यालयला लागून पॅरामेडिकल कालेज आहे. सदर कालेज मध्ये विद्यार्थी यांचे कडून एडमिशन च्या नावाखाली मोठी रक्कम वसूल केली जाते, ज्या वेळेस विद्यार्थी यांना वाटते की येथे शिक्षण घेऊन काही फायदा नाही, त्यावेळेस विद्यार्थी हे आपले मूळ दस्तेवज परत मागतात

पण त्या विद्यार्थ्यांचे ओरिजनल दस्ताएवज परत करीत नाही, त्यांना नाहक त्रास

दिल्या जातो. तसेच त्यांना पैशाची मागणी केली जाते, अशा प्रकारची तक्रार आमचे कडे दाखल झालेली आहे. सदर कालेज मध्ये शिकून सुद्धा त्या कालेजचा डिप्लोमा जर कोनत्याही कामात

येत नसेल तर त्या कालेज मध्ये शिकून काय फायदा, विद्यार्थी यांचे पैसे विनाकारण वाया जात आहेत. तरी या कालेजची सखोल पारदर्शक चौकशी करून या कालेजची मान्यता तात्काळ रद्द करावी. तसेच जबाबदार संस्थाचालक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी. 15 दिवसाच्या आत सादर कालेजवर कार्यवाही करावी. अन्यथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन जिल्हा गडचिरोली च्या

वतीने

जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल,असे निवेदनात म्हटले आहे