वर्धा जिल्हा भाजपा कार्यालयात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

 

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

वर्धा; जनसंघ ते भाजपा निर्माण कार्यात व पक्षाचे विचार घरोघरी पोचवणारे राष्ट्रभक्त, कवी साहित्यकार समाजसेवक भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुशासन चा नारा देऊन कृती मध्ये कार्य करून संसदीय परंपरा चे पालन करून देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण करणारे कार्यकर्ते तयार करून हिंदुस्थानचा गौरव वाढवला आहे. “त्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणे नमन करणे त्यांचे विचार अंगीकार करणे हे प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन भाजपाचे आमदार डॉ रामदास आंबटकर यांनी केले.”
भारतीय जनता पार्टी कार्यालयात भाजपा अध्यक्ष सुनील गफाट यांच्या अध्यक्षतेत येत्या 5 दिवसांमध्ये जिल्हाभरात अटल संवाद यात्रा विषयी संपुर्ण जिल्ह्यात इ श्रम कार्ड वाटप, कार्यकर्त्यांचा सत्कार, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, व्याख्यान मला, व अटलजी च्या व्यक्तिमत्त्वावर निबंध स्पर्धा.या प्रकार चे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तसेच या कार्यक्रमा अंतर्गत कार्यालयात जनसंघ ते भाजपा कार्य करणाऱ्या व मीसाबंदी मध्ये जेलमध्ये जाणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट प्रमुख उपस्थिती आमदार रामदास आंबटकर, महामंत्री अविनाश देव, लोकसभा सैयोजक जयंत कावळे, महिला मोर्चा अध्यक्षा मंजुषा ताई दुधबडे, श्री श्याम देशपांडे वर्धा विधानसभा प्रमुख प्रशांत बुर्ले,श्री पवन परियाल, युवा मोर्चा चे श्री वरून पाठक यांच्या समवेत सर्व भाजप पदाधिकारी मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कवितेचे वाचन सामूहिकरीत्या करून त्यांना नमन करण्यात आले. वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत आहे व सुशासन दिन देशभरात साजरा होत असून वेगवेगळे कार्यक्रम भाजपा तसेच विविध आघाडीच्या वतीने संपन्न होत आहे.