सद्गुणी व्यक्तीच्या संगतीत राहून मेहनत केली तर आयुष्य नक्की बदलेल – उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुनील साळुंखे

 

तालुका प्रतिनिधी // अभिषेक शुक्ला

स्थानिक नगर परिषद गांधी विद्यालय मध्ये आज दिनांक 24 डिसेंबर रोजी माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी हिंदकेसरी श्री सुनील सोळुंखे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. केंद्र शासनाचा नवीन उपक्रम स्टुडन्ट पोलीस कॅडेट जेणेकरून विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये एक नातं निर्माण हवं समाजामधील जाकी घातक गुन्हेगारी चे प्रमाण आहे त्याला आळा बसावा व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती जाऊन गुन्हा जर घडत असेल तर त्यांनी थेट पोलिसांपर्यंत संपर्क करावा .या उद्देशाने पोलीस विद्यार्थी सेना स्थापन करण्यात आलेली आहे. यावर माननीय उपविभागीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले तसेच त्यांनी शालेय जीवनापासूनच व्यायामाचे महत्त्व तसेच अभ्यासाचे महत्त्व समजून सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यामध्ये उज्ज्वल यश प्राप्त करण्याकरता सखोल मार्गदर्शन केले .याप्रसंगी एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे यांनी मागील वर्षी एनसीसी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण 49 सैनिकांना प्रमाणपत्राचे वाटप केले जे छात्र सैनिक सर्वोत्तम कामगिरी केलेले होते त्यांना मिडल, प्रमाणपत्र आणि स्मृती चिन्ह सुद्धा प्रदान करण्यात आले ,काही चित्रकला स्पर्धेमधील रनिंग स्पर्धेमधील विद्यार्थ्यांना तसेच रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी माननीय उषाताई नागपुरे मुख्याध्यापिका तसेच पर्यवेक्षक श्री एकनाथ गिरधर सर, सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते