मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने स्नेहसंमेलन सोहळा साजरा नितेश कराळे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

 

प्रतिनिधी // उमंग शुक्ला

 

दिनांक 21 डिसेंबर 2021 रोज मंगळवार ला जीवन संघर्ष बहु उद्देशीय संस्था सावली वाघ प्रणित महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक निराधार अत्याचार मुक्ती संघर्ष समिती हिंगणघाट चे वतीने स्नेहसंमेलन सोहळा साजरा करण्यात आला या वेळी समाज सेविका व लेखिका मंगला ठक यांनी आपल्या जीवनातून अविस्मरणीय क्षण टिपून पाठभर जखमा हे पुस्तकं लिहिले व मा . नितेश कराळे मास्तर जे युवकांचे प्रेरणास्थानआहे. यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले . या वेळी नितेश जी कराळे यांनी जनतेस संबोधित केले व मंगला ताई यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून सांगितले की निराधारांसाठी मी माझ संपूर्ण जीवन अर्पण केलं आहे आणि करत राहील समाजात महिलांचे जीवन नेहमीच परिवाराच्या आधीन राहले आहे . अनेक महिला परिवारातील तुटून वेगळ्या राहत आहे . व त्यांना पतीपासून वेगळे केल्यामुळे बरेच भावंडं व माहेर कडील परिवार आधार देत नाही व समाज सुधा धिक्कारतात अश्या महिलांना आणि मग पर्याय नसल्या मुळे एक तर आत्महत्येचा पर्याय निवडतात कीवां कोणाच्या आश्वासनांना बळी पडतात आणि आपल जीवन खराब करतात अश्या सर्व अत्याचारित महिलांचा व ज्यांना मुल नाही म्हणून म्हातारपणाची आधार नाही अश्या निराधार महिलांचा मी आधार बनून आपले कार्य करत राहील अशी हमी निराधार संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मंगला ठक यांनी जनतेस दिली . तसेच या स्नेहसंमेलन सोहळ्यात तळागळातील समाज कार्य करून लोकाना मदत करणारी सामाजिक कार्यकर्त्यांचे शाल श्रीफळ व ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला सत्कार मूर्ती नितेश कारले सर , मा. हितेश दादा बनसोड रस्त्यावर फिरणाऱ्या पागल अवस्थेतील लोकांचे पुनर्वसन ,मा. इरफान खान युवा लेखक , प्रवीण जी पेठे माझी सैनिक , पत्रकार प्रा. किरण वैद्य सर , अब्दुल कादिर बक्ष पत्रकार , मा. विलास भोयर साहेब माझी सैनिक , छब्बु ताई जाधव , संगीता ताई ठवले व धवणे गुरुजी यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करू यांना गवरविण्यात आले या वेळी अनेक गावचे गावकरी व शहरातील मान्यवर तसेच निराधार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .