प्रतिनिधी // उमंग शुक्ला
पथदर्शक परिवार, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका ,कास्ट्राईब शिक्षक संघटना , ब्लास्ट बचत गट आर्वी जि. वर्धा द्वारा “स्मृतीशेष आई देवकाबाई बापुरावजी बनसोड यांच्या स्मृति प्रित्यर्थ दिले जाणारे देवकाई राज्यस्तरीय पुरस्कार 2021″जाहीर करण्यात आले आहे.
▪️प्रथम पुरस्कार-कवयित्री पुष्पा प्रकाश बोरकर,अमरावती(कवितासंग्रह-अजूनही वेळ गेलेली नाही)
द्वितीय पुरस्कार -कवी सुनील दौलत खोडके,डोणगाव, जि.बुलढाणा(कवितासंग्रह-काळ नक्कीच नोंद घेईल) ,तृतीय पुरस्कार-कवी अरूण हरिभाऊ विघ्ने,रोहणा ता,आर्वी, जि.वर्धा
(कवितासंग्रह-पिंपळ व्हायचंय मला), प्रोत्साहनपर पुरस्कार _सुनंदा बोदिले,अमरावती,(माणूस झाड आणि माती), गझलकार प्रमोद वाळके संपादीत (दिवंगत भाऊ पंचभाई यांच्या गझलगंधा)
या कवितासंग्रहाला प्राप्त
झालेले आहे.
कसदार आशय,नविन प्रयोग, कवितेची दमदार भाषाशैली,मानवी मूल्यांचा अंतर्भाव, प्रखर सामाजिक जाणिव. इत्यादी मुद्द्याला अनुसरून कवी संजय ओरके, समीक्षक प्रशांत ढोले, कवी प्रा.अभय दांडेकर यांनी पारदर्शक व न्याय देणारे परीक्षण करून निकाल दिला आहे.
▪️या पुरस्कार सोहळ्याचे वितरण आर्वी जि. वर्धा येथे दिनांक 29/12/2021 ला दादाराव केचे (आमदार, आर्वी,), अध्यक्ष प्रा.प्रमोद हातेकर (समन्वयक महात्मा जोतिबा फुले अभ्यासिका,धामणगाव), प्रमुख अतिथी डाॅ.शांतरक्षित गावंडे,यवतमाळ,प्रा.प्रशांत सव्वालाखे (नगराध्यक्ष, न.प.आर्वी), रवी दलाल (कादंबरीकार), धम्मा कांबळे(मार्शल समता सैनीक दल,यवतमाळ), राजू थुल, (सदधम्म प्रचारक,वर्धा,), प्रा.अभय दर्भे, (माजी प्राचार्य, माॅडेल हायस्कूल, आर्वी),प्राचार्य डाॅ.भूषण रामटेके (कवी,समिक्षक), प्रमोद मुरार, (जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब, शिक्षक संघ, वर्धा) इ.मान्यवर मंडळी यावेळेस उपस्थित राहतील.
पुरस्कार स्वरूप मानपत्र,सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ इ. स्वरूपाचे राहील असे आयोजक कवी,शिक्षक प्रकाश बनसोड सर यांनी कळविले आहे. हा कार्यक्रम पी.एस.डी.मंगलम् गोकृपा नगर, तायडे ले-आऊट,आर्वी, जि.वर्धा येथे दि.29डिसेंबर 2021ला संपन्न होणार आहे.