आष्टी नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ४ हजार ५९० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क! मतदान टक्केवारी ७२.०९

 

येथील नगर पंचायत साठी आज झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ७२ टक्के मतदान झाले त्यामुळे सदर निवडणुकीत मतदारांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला असल्याचे बोलल्या जाते याबाबत असे की, आज आष्टी नगरपंचायतच्या १७ पैकी १३ जागेसाठी १३ मतदान केंद्रावरून मतदान घेण्यात आले यात ३/१७ या हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय खोली नं.१ मधील मतदान केंद्रावर ८० टक्के १४ असे विक्रमी मतदान झाले तर सर्वात कमी मतदान १३/१७ महात्मा गांधी जि.प. प्रा शाळा खोली न ३ मध्ये ६६ टक्के ९३ पर्यंत झाले याची सरासरी ७२ टक्के मतदान झाले आहे सकाळी ७:३० मिनिटांनी सुरू झालेल्या मतदानात सुरुवातीपासूनच मतदारांनी रांगाच्या रांगा लावून उस्फुर्त सहभाग नोंदविला आणि तो शेवटच्या टप्प्यापर्यंत कायम राहिला नगरपंचायतच्या एकूण६ हजार ३६७ मतदारांपैकी ४ हजार५९० मतदारांनी मतदान केले असून यातील पुरुष मतदार २ हजार ४४५ तर २ हजार १४५ मतदारांनी मतदान करून लोकशाहीत सहभाग नोंदविला यावरून आष्टी नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी मतदारांनी आपला संवैधानिक अधिकार गाजवला आहे मात्र सदर मतदानाचा निकाल १९ जानेवारी २२ ला लागेल यासाठी मतदारांना व उमेदवारांना थोडी प्रतिक्षा करावी लागेल एवढं मात्र खरे