छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणार्यांवर कठोर कारवाही करा; शहर युवक काँग्रेस

प्रतिनिधी // उमंग शुक्ला

सदर निवेदनात असे म्हटले आहे की

कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजाकडून विटंबना करण्यात आली ही अतिशय दुर्दयी घटना आहे. नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशाची

संकृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच भाजपशासीत कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक असुन याचा आम्ही तीव्र निषेध करतो.

छत्रपती शिवाजी महाराज आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहे. त्यांचा अपमान खपवुन घेणार नाही. कर्नाटकामधील अशा हिणकस व विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालून दोषींवर कडक कारवाईचे आदेश कर्नाटक प्रशासनाला द्यावे ही आग्रही मागणी आमची आहे.

निवेदन देताना :- शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष सागर शिरपुरकर आर्वी तालुका कॉंग्रेस अध्यक्ष विशास साबळे गौरव मोहोड, निलेश देऊळकर, विक्की लसुन्ते, बंटी सुरवाडे, हितेश मेंद्रे, अक्षय बिजवे, गणेश नारकोत, सोनु महाजन, शाहरुख खान, शुभम बरडे, ओम चौधरी, वजाहत खान, प्रज्वल दानव, इरफान रजा, मौफील खान, अमित खंडाते, साईराज मेंद्रे, जावेद खान, मुजफ्फर शेख, दानिश खान,सोनु लोहार असंख्य युवक कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.