विध्यार्थ्यांसाठी एक दिवसीय सायबर जनजागृती शिबीरचे आयोजन

 

शोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहणे फार महत्वाचे : प्रणय ढोले

धार्मिक भावना दुखावणाऱ्या किंवा भडकवणाऱ्या पोस्ट लाईक शेयर करू नका : महेंद्र इंगळे

वर्धा : सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांना पुरेपूर माहिती देण्यासाठी आचार्य श्रीमन्नारायण तंत्रनिकेतन या महाविद्यालयात आज दिनांक १८-१२-२०२१ रोजी एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले. यात प्रमुख उपस्थिती म्हणून वर्धा सायबर सेलचे सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस हवालदार निलेश कटटोजवार, नाईक पोलीस शिपाई अनुप कावळे आणि निर्भीड लोकमाध्यम न्यूज चे मुख्य संपाद्क प्रणय ढोले उपस्थित होते.

इंटरनेट क्रांती हि आजवरची सर्वात मोठी क्रांती मानल्या गेली आहे. इंटरनेटने सर्वत्र क्षेत्रात प्रवेश केला आहे. ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन खरेदी, मेसेजिंग, ई-गव्हर्नन्स, फेसबुक, व्हाटसअँप, ट्विटर, विडिओ कॉल इत्यादि गोष्टीमुळे देशाच्या सीमारेषाही पुसून गेल्या असून सर्व जगातले लोक एक कॉल दूर आहेत आणि इतके जवळ आले आहेत. वाढत्या इंटरनेटच्या वापराबरोबरच सायबर गुन्हेगारांनी गुन्हेगारीच्या नवनवीन पद्धती शोधून लोकांचा पैसा आणि खाजगी गोपनीयता याला मोठा धक्का निर्माण झाला आहे. इंटरनेटचे तंत्रज्ञान वारंवार बदलत असल्यामुळे सायबर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान सध्या आहे. इंगळे यांनी बँक फ्रॉड, ऑनलाईन फ्रॉड, जॉब फ्रॉड, सोशल मीडिया फ्रॉड याबाबतची माहिती दिली. या कार्यक्रमात तंत्रनिकेतन कॉलेज मधील प्राचार्य डॉ. प्रवीण पाचपोर, प्रा. राहुल कासारे, प्रा. प्रवीण वाघमारे, सुनील अंभोरे, प्रज्वल ढोले तसेच सर्व कर्मचारी आणि विध्यार्थी उपस्थित होते.