वजन काट्याची वार्षिक पडताळणी न केल्यामुळे वैधमापन शास्त्र विभागाची कारवाई

प्रतिनिधी // कृनाल राऊत

धानोरा ; वैधमापनशास्त्र नागपूर विभागाचे सहनियंत्रक श्री बिरादार, उपनियंत्रक चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याचे ह.तु.बोकडे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली विभागाचे वैधमापनशास्त्र अधिकारी रूपचंद फुलझेले यांनी दिनांक 17 डिसेंबर रोजी धानोरा तालुक्यात कारवाई केली.
वार्षिक पडताळणी व मुद्रांकण न करता वजन वापर केल्या बाबत 12/23 नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विनोद निकुरे, दूधमाळा,धानोरा, आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, दुधमाळा, धानोरा, यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे रूपचंद फुलझेले वैधमापनशास्त्र अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.