साडेचार हजाराची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

 

जिल्हा प्रतिनिधी // कृनाल राऊत

 

गडचिरोली ; वडसा येथे एका दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून दारू विक्री करण्यासाठी आणि केस न करण्यासाठी लाच घेतांना सहाय्यक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्याची घटना वडसा पोलिस स्टेशन अंतर्गत घडली.
अटक करण्यात आलेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव प्रेमचंद जितलाल माच्छिरके वय 53वर्ष असून याने 5हजाराची लाच मागितली होती परंतु तडजोड करून 4500 रू.स्वीकार करत असताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.सदर कारवाईत पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शनात पोलिस उप अधीक्षक सुरेंद्र गरड यांचे नेतृत्वात सफौ प्रमोद ढोरे, पोहवा नत्थू धोटे,पोना किशोर जोंजारकर.श्रीनिवास संगोजी…पोशी किशोर ठाकूर,तुळशीराम नवघरे यांनी यशस्वी कामगिरी पार पाडली.