शहरातील फुले वार्डातील उच्च शिक्षित युवती मयुरी रायपूरे उर्फ मासरकर यांचे निधन

 

प्रतीनिधी // कृनाल राऊत

 

गडचिरोली ; शहरातील फुले वॉर्ड येथील उच्च शिक्षित युवती मयुरी रायपुरे उर्फ मासरकर ही आपल्या बाळंतपणासाठी माहेरी आलेली होती.आज सकाळी अचानक घरीच चक्कर येऊन पडल्यामुळे अस्वस्थ झाल्याने महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.महिला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या सह, रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करीत मयुरीला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.परंतु दुर्दैवाने दुपारी बारा वाजता च्या दरम्यान प्रकृती बिघडल्याने तिचे निधन झाले. तिच्या निधनामुळे फुले वॉर्ड येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली आहे.