दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

 

 

 

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी द्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. 4 मार्च 2022 ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 यादरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे.