अवैध दारू तस्करी करणारा पोलिसांच्या जाळयात एकूण 1,78,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

 

दिनांक 13/12/2020 रोजी पो.स्टे. परीसरात कर्मचारी पेट्रोलींग करीत असताना पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना मुखबिर मार्फत खबर मिळाली वरुन यातील आरोपी बादल मनोज सहारे वय 35 वर्ष रा. नागपुर फैल पुलगाव ता. देवळी जि. वर्धा हा मिळाल्याने दोन पंच व पो.स्टाप सह खाजगी वाहनाने रवाना होवुन अमरावती-वर्धा हायवे रोडवरील आपटी फाटा चौक पुलगाव येथील रोडवर सापडा रचुन प्रो. रेड घातला असता त्यांचे ताब्यातुन 1) 08 खर्डाचे खोक्यात 180 एम एल च्या देशी दारुने भरलेल्या सिलबंद 384 शिश्या प्रती नग 100 रु. प्रमाणे 38,400/- रु 2) एक सिल्वहर रंगाची जुनी वापरती फोरव्हीलर ChevnoleT Spark कंपनिची गाडी क्र. MH-14 BK-0483 कीमत अंदाजे 1,40,000/- असा एकुण जुमला कि. 1,78,400 रु.चा माल बिनापास परवाना अवैध्यरित्या, वाहणाचे कागदपत्र व लायसन्स सोबत नबाळगता वाहतुक करीत असताना पंचासमक्ष मिळुन आल्याने मौका जप्ती पंचनामा करून पो.स्टेला परत येवुन आरोपी विरुध्द म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद केला.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव श्री. गोकुळसिंग पाटील यांचे मार्गदर्शनात श्री. शैलेश शेळके पोलीस निरीक्षक पो.स्टे. पुलगाव यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरणाचे अंमलदार स.फौ. खुशालपंत राठोड, नापोकॉ. बाबुलाल पंधरे, महादेव सानप, जयदिप जाधव, मुकेश वांदिले यांनी केली आहे.