20 हजार किमतीचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या चोरट्याला अवघ्या 6 तासात पोलिसांनी टाकल्या बेड्या

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, दिनाक 12/12/2021 रोजी नामे श्रीमती निर्मला निळकंठ गजभिये वय 52 वर्ष रा. गुलझारी प्लॉट वार्ड क्र. 18 ता. देवळी जि.वर्धा हिने पो.स्टेला तोंडी रिपोर्ट दिला की यातील फिर्यादी हि बाजारात गेली असता व बाजारातुन घरी परत आल्यावर घराचे कुलुप तुटलेले दिसले. त्यामुळे फिर्यादी हिचे घरात चोरी झाली असे फिर्यादीचे लक्षात आले म्हणुन फिर्यादी ही घरात जावुन बेडरुम मधील आलमारी पाहीली असता आलमारीला चाबी लागुन होती व आलमारी उघडी होती तसेच आलमारीचे लॉकर चाबीसह उघडे दिसले त्या लॉकर मध्ये पाहणी केली असता लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याच्या पोहळे मनी व पेन्डाल असलेली मगळसुत्र चोरीस गेल्याचे दिसले. त्यापैकी मन्याचे वजन 03 ग्राम व पन्डलचे वजन 04 ग्राम असे एकुण वजन 07 ग्राम किंमत 20,000/- रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचे दाराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन चोरुन नेले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट दिल सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात आहे.

सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक श्री. शैलेश शेळके साहेब यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरन पथकाचे अमंलदार स.फौ. खुशालपंत राठोड, पो.ना. बाबुलाल पंधरे, जयदीप जाधव, मुकेश वांदिले हे तपास करीत असतांना पो.स्टे. हद्दीतील सराईत गुन्हेगाराना ताब्यात घेवुन विचारपुस करुन मुखबिर मार्फत प्राप्त माहीती वरून आरोपी नामे सचिण निळकंठ गजभिये वय 27 वर्ष रा. गुलझारी प्लॉट पुलगाव ता. देवळी जि. वर्धा याला ताब्यात घेऊन त्यांचे पासुन पिवळ्या धातुचे अष्टकोनी 20 मनी ज्याचे वजन 0.980 मीली 2) पिवळ्या धातुचे फॅन्सी गहु मनी ज्याचे वजन 2.430 ग्राम 3) पिवळ्या धातुचे पेन्डाल ज्याचे वजन 3.520 ग्राम असे एकुण 6.930 ग्राम ज्यात काळेमनी असलेले मंगळसुत्र अंदाजे एकुण जु.की.20,000/- चा माल हस्तगत करुन सदरचा गुन्हा 06 तासात उघडकीस आणला.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत होळकर, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव श्री. गोकुळसिंग पाटील यांचे मार्गदर्शनात श्री. शैलेश शेळके पोलीस निरीक्षक पो.स्टे. पुलगाव यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरणाचे अंमलदार स.फौ. खुशालपंत राठोड, नापोकॉ. बाबुलाल पंधरे, महादेव सानप, जयदिप जाधव, मुकेश वांदिले यांनी केली आहे.