वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम येथे सायबर गुन्हे जनजागृती अभियान अंतर्गत सायबर गुन्ह्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन 

 

प्रतिनिधी // उमंग शुक्ला

दिनांक १४-१२-२०२१ रोजी दुपारी ०३.३० वा. वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम येथे येथे पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा व वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यामानाने सायबर गुन्हे जनजागृती अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या बदलत्या व शिघ्रगतीने प्रगत होणाऱ्या यूगात सायबर गुन्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढत होत असून त्यावर प्रतिबंध म्हणून सदर गुन्ह्याबाबत माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता वर्धा जिल्हा पोलीस दला दलातर्फे सायबर गुन्हे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
सायबर शाखेतर्फे सहा. पोलीस निरीक्षक श्री महेंद्र इंगळे यांनी फेसबूक, व्हाट्सअॅप व इतर सोशल मिडीयाचे गैरवापर रोखण्याकरीता व सायबर जगात स्वतःला सुरक्षीत ठेवण्याच्या उपायांची माहिती दिली तसेच ऑनलाईन बॅंकीग व्यवहारातील फसवणूकीपासून स्वतचा बचाव करून इतर लोकांना सुध्दा सतर्क करण्याबाबत सांगण्यात आले. गुन्हा होण्यापूर्वी त्यावर प्रतिबंध व जनजागृती हाच नुकसानापासून वाचण्याचा सर्वात चांगला उपाय आहे या बाबत माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमास वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम येथील डॉ. दिलीप गुप्ता, डॉ. अनुपमा गुप्ता, डॉ. इंद्रजीत खांडेकर, डॉ. प्रदीप बोकारिया, डॉ. प्रवीण झोपटे व सायबर शाखेतील अधिकारी श्री महेंद्र इंगळे व निलेश कट्टोजवार, अंकित जिभे, शाहीन सय्यद, स्मिता महाजन तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.