निवडणुकीमुळे जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा व कॉलेज तसेच अंगणवाडीला 20 व 21 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर

भंडारा, दि. 14 : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया निश्चित केलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी सर्व मतदान साहित्यासह मतदान पथके 20 डिसेंबर रोजी पोहोचतील.

 

दिनांक 21 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी साडेपाच नंतर रात्री उशिरापर्यंत सर्व साहित्यासह परत येणार आहेत. मतदान केंद्राचे ठिकाण हे शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा व कॉलेज तसेच अंगणवाडी येथील इमारतीमध्ये आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय,

 

निमशासकीय, खाजगी शाळा व कॉलेज तसेच अंगणवाडी यांना दिनांक 20 व 21 डिसेंबर रोजी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी निर्गमित केले आहेत.