मोटारसायकल चोरटा अवघ्या २४ तासात पोलीसांच्या जाळ्यात

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

दिनांक ११-१२-२०२१ ते १२-१२-२०२१ रोजी रात्र दरम्यान देवळी शिवारातील फिर्यादी श्री रितेश श्रीकांतराव येणुरकर, वय २२ वर्ष, रा. देवळी यांनी त्यांचे जवळ असलेली यामहा कंपनीची मोटारसायकल क्र. एमएच ३२/ एकयू-३०७६ किंमत ९०,०००/- रु. ची घरासमोर उभी करून हँन्डल लाँक करुन बाहेर गेले व रात्री ११.०० वा. परत आले असता फिर्यादीची मो.सा. घराजवळ दिसली नाही. सदर मोटारसायकलचा आजुबाजूचे परिसरात शोध घेतला असता मिळुन न आल्याने फिर्यादीने पोस्टे देवळी येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप.क्र. १०५३/२०२१ कलम ३७९ भादंवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेवून गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी आरोपीचा शोध सुरू केला. पेट्रोलींग दरम्यान मुखबिरकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन आरोपी विनोद संतोष शेंदरे, रा. निलडोह, ता. हिंगणा याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचे कडून गुन्हात चोरलेली मोटारसायकल हस्तगत करून अवघ्या २४ तासात वर नमूद गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव श्री. गोकुळसिंग पाटील यांचे मार्गदर्शनात मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. तिरुपती ठाणेदार पो.स्टे. देवळी यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि. कांबळे, पोलीस अंमलदार कुणाल हिवसे, अनिल तिवारी, उमेश गेडाम, दयाल धवने, नेमणूक सर्व पो.स्टे. देवळी यांनी केली आहे.