पत्नीनेच केला पतीचा खून, मृतदेहासोबत काय केल अवश्य वाचा

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

माजलगाव धरणात 27 सप्टेंबर 2021 रोजी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. संबंधित मृतदेह तालखेड येथील रहिवासी असणाऱ्या दत्तात्रय रामकिसन घायाळ (वय-30) यांचा असल्याचं समोर आलं. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण दत्तात्रय यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचं गूढ मात्र कायम होतं. पोलीस तपास करतच होते.

12 डिसेंबर रोजी मृत दत्तात्रय घायाळ यांचा भाऊ पवन घायाळ यानं 12 डिसेंबर रोजी पोलिसांत एक तक्रार दाखल केली. दत्तात्रय यांच्या पत्नीने आणि सासऱ्यानेच त्याची हत्या केल्याचं त्याने तक्रारीत म्हटलं. जमीन नावावर का करून देत नाही,

या कारणातून सासरे जनार्दन म्हस्के (65) आणि पत्नी गीता घायाळ यांनीच दत्तात्रय यांच्या डोक्यावर आणि कपाळावर बोथट हत्याराने वार केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. खून केल्यानंतर आरोपी

 

बापलेकीनेच दत्तात्रय यांचा मृतदेह माजलगाव येथील धरणात टाकून दिल्याचंही भावानं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नी आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास माजलगाव शहर पोलीस करत आहेत.