गावातील महिलांनी घरावर धडक देत जप्त केली अवैध दारू दारू विक्रेत्याच काय झाल अवश्य वाचा

 

जिल्हा प्रतिनिधी // कृनाल राऊत

 

आरमोरी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जोगीसाखरा येथे एक व्यक्ती चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळताच गावातील महिलांनी दारूविक्रेत्याच्या घरावर धडक देत दारू जप्त केली आहे. परंतु कारवाई दरम्यान रत्नाकर कुमरे नामक दारू विक्रेता फरार होण्यात यशस्वी झाला. महिलांच्या या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. रत्नाकर कुमरे नामक दारू विक्रेता मागील काही दिवसांपासून आपल्या घरात अवैध दारूविक्री करीत होता. याची माहिती मिळताच गावातील महिलांनी अवैध दारूविक्रेत्याच्या घरावर धाड टाकली. दरम्यान महिलांनी हजारो रुपयांची दारू जप्त केली. परंतु दारू विक्रेता घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला. या कारवाई संदर्भात महिलांनी आरमोरी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत दारू जप्त केली. तसेच दारू संबंधित विक्रेत्यावर आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.