अखेर 4 वर्षा पासुन पसार असलेल्या आरोपीला शोध घेवून पकडण्यात आले यश आर्वी पोलिसांचे प्रशंसनीय कार्य

 

प्रतिनिधी // उमंग शुक्ला

 

पोलीस स्टेशन आर्वी येथे सन 2017 मध्ये फिर्यादी यांचे रिपोर्ट वरुन आरोपी गौतम उकठराव मेश्राम रा. शिरपुर बोके जिल्हा वर्धा यांचे विरुध्द पोलीस स्टेशन आर्वी येथे अपराध क्र. 1156/2017 कलम 324 भा.द.वी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपी हा सन 2017 पासुन पसार झाले त्यांचा वारंवार शोध घतला असता तो मिळुन न आल्याने फरार आरोपी विरुध्द दोषारोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आले होते तेव्हा पासुनच पोलीस त्यांचे मागावर होते.

दिनांक 11/12/2021 रोजी पोउपनी योगेश चाहेर व डि.बि. पथक फरार पाहीजे असलेले आरोपी यांचे शोधात असताना त्यांना मिळालेल्या गुप्त बातमी दाराचे खात्रीशिर माहीती वरुन 4 वर्षा पासुन पसार असलेला आरोपी गौतम उकठराव मेश्राम रा. शिरपुर बोके जिल्हा- वर्धा याचेवर सापळा रचुन अत्यंत शिताफिने त्याला ताब्यात घेवुन पोहवा अमोल बरडे यांनी केस क्र. 157/2018 मध्ये अटक करुन सदर आरोपी यास कोर्ट पेश करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही  पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर , श्री. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके  उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. सुनील साळुंखे यांचे मार्गदर्शनात मा.नि. श्री भानुदार पिदुरकर सा. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोउपनी योगेश चाहेर,डि.बी. पथकातील पो.ह.वा. अमोल बरडे, पोलीस नाईक. भुषण निघोट, चंद्रशेखर वाढवे, राजु राउत, अतुल भोयर, मनोज भोमले, पोलीस स्टेशन आर्वी यांनी केली.