८९ प्रलंबित आणि ४१४ दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली रूपये दोन कोटी (२,१२,६६,९५०/-) वसुली

 

गडचिरोली जिल्हयातील न्यायालयात दिनांक ११ डिसेंबर, २०२१ रोजी तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी मामले तसेच इतर मामल्याकरीता राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातुन ठेवण्यात आलेल्या प्रकरणांपैकी ८९ प्रलंबित आणि ४१४ दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढले आणि रूपये दोन कोटी (२,१२,६६,९५०/- ) वसुली करण्यात आली. किरकोळ स्वरूपाच्या मामल्यांकरीता स्पेशल ड्रायव्हद्वारे एकुण २६ प्रकरणे निकाली काढण्यात आलीत.

श्री. यु.बी. शुक्ल, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली व मा. श्री. डी.डी. फुलझेले, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री.यु.एम.मुधोळकर, जिल्हा न्यायाधीश -१ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश, गडचिरोली यांनी
पॅनल क्र.०१ वर काम पाहीले तसेच श्री. डी.जी.कांबळे, जिल्हा न्यायाधीश – ०२ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश, गडचिरोली यांनी पॅनल क्र. ०२ वर काम पाहीले. तसेच पॅनल क्र. ०३ वर मा. श्री. एम.आर. वाशिमकर, दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) तथा मुख्य न्यायदंडाधिकारी, गडचिरोली तर पॅनल क्र. ०४ वर मा. श्री. आर.आर.खामतकर, दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली यांनी काम पाहीले.

तसेच पॅनल कमांक ०१ मध्ये पॅनल सदस्य म्हणून मा. श्री. आर.बी.म्हशाखेत्री, अधिवक्ता
गडचिरोली आणि मा. श्री.अकील शेख, विधी स्वयंसेवक, पॅनल क्रमांक ०२ मध्ये पॅनल सदस्य म्हणून मा.श्री. एस.एल.जनबंधू, पॅनल अधिवक्ता, आणि श्रीमती सुरेखा बारसागडे, विधी स्वयंसेविका, पॅनल कमांक ०३
मध्ये पॅनल सदस्य म्हणून मा. श्री. एस. डब्ल्यु. सकिनलवार, पॅनल अधिवक्ता, आणि कु. अर्चना चुधरी, विधी स्वयंसेविका, पॅनल क, ०४ मध्ये पॅनल सदस्य म्हणून मा. श्री. ए.एम.अंजणकर, पॅनल अधिवक्ता आणि मा. श्री. नरेंद्र मोटघरे, विधी स्वयंसेवक, गडचिरोली यांनी काम केले.

लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्र दोनाडकर, तसेच जिल्हा वकील संघाचे जेष्ठ अधिवक्ता आणि इतर न्यायालयातील वकील वृंद व न्यायालयीन
कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.