कृपया मत मागायला येऊ नये’; ओबीसींच्या घरावर पाट्या ओबीसी नि असा निषेध नोंदवला

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपल्यामुळे ओबीसी समाजाच्या संघटना आणि नागरिक संतापले आहेत. येत्या 21 डिसेंबरला होणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी ‘आमच्याकडे मत मागायला येऊ नये’ अशा आशयाच्या पाट्या आपल्या घरावर लावल्या आहेत. भंडारा जिल्ह्याच्या पिपरी पुर्नवसन या गावात नागरिकांनी अशा पाट्या लावत निषेध केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात ओबीसींनी असा निषेध नोंदवला आहे.