भाजयुमो तर्फे बिपीन रावत व शाहिदांना वाहिली श्रद्धांजली

 

भारताचे पहिले CDS जनरल बिपीन रावत यांचे तामिळनाडू येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले आहे. तामिळनाडूच्या कुन्नूर परिसरात हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर कोसळले. या अपघात बिपीन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका रावत आणि इतर 13 जणांचा मृत्यू झाला.बिपीन रावत यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. बिपीन रावत यांच्या निधनानंतर त्यांना भाजयुमो वर्धा जिल्हा तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दिनांक १० डिसेंबर रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वर्धा विधानसभेचे आमदार डॉ पंकज भोयर,माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष वरुण पाठक, भाजपा नेते कमल कुलधरिया, यांनी श्रद्धांजली अर्पण केली.बिपीन रावत यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतलं होतं, त्यांचे वडील सैन्यात होते. तर त्यांची पत्नी गृहिणी असूनही सैन्याच्या परिवारांसाठी एका संस्थेच्या मध्यमातून काम करत होत्या. असे व्यक्तिमहत्व देशाने गमावल्याने फक्त भारतातूनच नाही तर संपूर्ण जगातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कारण एक सच्चा सैनिक काय असतो याचं उत्तम उदाहण म्हणजे बिपीन रावत होते असे पंकज भोयर म्हणाले. यावेळीगौरव गावंडे,कृष्णा जोशी, वैभव तिजारे,रितेश साठोणे,अनिल धोटे,प्रसाद फटिंग, प्रिया ओझा,शामल धोडरे, अरविंद कोपरे,सौरभ देशमुख,विवेक कुबडे,कुणाल दूरतकर, रवि खंडारे, व भाजयुमो पदाधिकारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.