मागिल 12 वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपीचा शोध घेवून अटक

 

पो स्टे आर्वी येथील सतत 12 वर्षापासुन पाहीजे असलेला आरोपी कमलराज रेजाराव भोसले, वय 58 वर्षे, रा नांदोरा पुनर्वसन ता आर्वी, जि. वर्धा याचा मा कोर्ट आर्वी यांचे आदशान्वये स्टॅडींग वारंट असल्याने त्याचा आर्वी परीसरात तसेच इतरत्र शोध घेत असतांना अतोनात प्रयत्नातुन नमुद आरोपी हा काळागोटा (पारधी बेडा) ता तिवसा जि अमरावती येथे राहत असुन तो सध्या मौजा मारडा बस स्टॉफ ता तिवसा, जि. अमरावती येथे उभा असल्याची माहीती गुप्त बातमीदारांकडुन प्राप्त झाल्याने त्याचा शोध घेतला मिळुन येताच त्यास ताब्यात घेवुन दोन्ही गुन्हयाचे स्टॅडीग वारंटमध्ये अटक करून कोर्ट आर्वी येथे पेश करण्यात आले सदरची कार्यवाही मा पोलीस अधिक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उप. वि. पो. अधि श्री सुनिल साळुंके यांचे मार्गदर्शनामध्ये मा पोलीस निरीक्षक श्री भानुदास पिदुरकर यांचे प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये गुन्हे शोध पथकातील पो हवा रंणजित जाधव, ना पो शि अनिल वैदय, ना पो शि सुनिल मळणकर, पो. शि. सतिश नंदागवळी, पो. शि प्रदिप दातारकर, पोलीस स्टेशन आर्वी, यांनी केली