ओमिक्रॉनमुळे इथे कलम 144 लागू कुठे लागले 144 कलम अवश्य वाचा

ओमिक्रॉनमुळे इथे कलम 144 लागू

कुठे लागले 144 कलम अवश्य वाचा

महाराष्ट्रातील ओमिक्रॉन वेरिएंटचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मुंबईत काल ओमिक्रॉनचे 3 रुग्ण सापडले आहेत आणि पिंपरी चिचंवडमध्ये नव्यानं 4 रुग्ण आढळले. राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 रुग्ण सापडल्याने ही संख्या 17 वर गेली आहे. मुंबईतील ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळं त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. अखेर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 12 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मोर्चे, आंदोलन आणि रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे. या कालावधीत कोणत्याही आंदोलनाला परवानगी देण्यात येणार नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.