आयटीआय’च्या 41 विद्यार्थिनींना ‘टेक्नोक्रॉफ्ट कंपनी’मध्ये रोजगार

 

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, बी .टी. आर.आय, आय.टी.आय. यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजिलेल्या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील विविध आयटीआयच्या ४१ विद्यार्थिनींची नांदगावपेठ येथील ‘टेक्नोक्राफ्ट कंपनीत” निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के.एस.विसाळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य मंगलाताई देशमुख यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले.

टेक्नोक्राफ्ट कंपनीचे उपाध्यक्ष राजेंद्रकुमार, जॉन्सन सॅम्युअल, प्राचार्य सुरेश कुमरे उपस्थित होते.यानंतरही सातत्याने विविध कंपन्यांचे रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतील, असे श्री. विसाळे यांनी सांगितले.