घरकाम करणाऱ्या मुलीला विवस्त्र करून मारहाण पीडित मुलगी अल्पवयीन

 

प्रतिनिधी // उमंग शुक्ला

घरकाम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला विवस्त्र करुन बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात हा प्रकार आहे.

 

पीडित मुलगी 17 वर्षांची असून ती आरोपी महिलेच्या घरी घरकाम करते. हे प्रकरण समोर आल्यानंतर या घटनेप्रकरणी पोलिसांतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीच्या भावाने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेच्या विरुद्ध संबंधित कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना 6 डिसेंबर रोजी घडली आहे. पीडित मुलगी ही अंधेरीतील वर्सोवा परिसरात एका महिलेकडे घरकाम करते. 6 डिसेंबर रोजी या मुलीला कामावर जाण्यासाटी थोडा उशीर झाला.

 

याचाच राग आल्याने घर मालकिन असलेल्या महिलेने या मुलीला कपडे उतरवण्यास सांगितले त्यानंतर तिला बेदम मारहाण केली. आरोपी महिला यावरच थांबलेली नाही तर या मुलीला नग्न करून तिचा व्हिडीओ सुद्धा शूट केला.