एनसीसी छात्र सैनिकांनी दिली जनरल रावत यांना श्रद्धांजली

 

प्रतिनिधी // अभिषेक शुक्ला

नगर परिषद गांधी विद्यालयातील एनसीसी छात्र सैनिक सर्व शिक्षक विद्यार्थी कर्मचारी यांच्या तर्फे आज दिनांक 9 डिसेंबर रोजी श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेण्यात आला हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये जनरल बिपिन रावत त्यांची धर्मपत्नी तसेच इतर जे सेनेतील अधिकारी होते अशा एकूण तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना सर्वांसाठी अतिशय दुःख दायक आहे त्यासाठीच त्यांच्या कुटुंबांना शांतता मिळावी या उद्देशाने एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे यांनी या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये मुख्याध्यापिका उषाताई नागपुरे मॅडम पर्यवेक्षक एकनाथ गिरीधर सर एनसीसी छात्र सैनिक यांनी पुष्पचक्र पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देऊन मौन श्रद्धांजली अर्पण केली .