जनावरे चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ५,६९,००० रु मुद्देमाल केला जप्त

 

प्रतिनिधी // उमंग शुक्ला

पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे फिर्यादी नामे विलास पुंडलीक वाले रा. कोसुल यांनी दि. 07/12/2021 रोजी दिलेल्या तक्रारी वरुन अप. क्र. 490/2021 कलम 379 भा. दं. वि. चा गुन्हा नोंद झाला होता.

सदर तपासात आरोपी क्र. १) अविनाश सुभाष काळे वय २८ वर्ष २) गणेश मोरेश्वर ढेकने वय २५ वर्ष ३) स्वप्रील मारोती कुडमते वय २४ वर्ष तिन्ही रा. डौलापुर ता. हिंगणघाट यांना शिताफिने ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातुन १) दोन बैल कि. ५००००/- रु. २) एक कालवड कि. २०००/- रु. ३) एक गाय कि.१००००/- रु. ४) एक गोरा कि. ७०००/- रु. ५) बोलेरो पिकअप गाडी क्र. एमएच ३२ एजें १९१५ कि. ५,००,०००/- रु. असा एकुन ५,६९,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत होळकर सा. वर्धा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. यशवंत सोळके सा. बर्धा, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधीकारी, पुलगाव गोकुळसिंह पाटील, व पोलीस निरीक्षक श्री. सुनिल गाडे पो.स्टे. अल्लीपुर यांच्या मार्गदर्शनात पोउपनि रमेशकुमार मिश्रा, सफ़ौ. संजय रिठे, पोशि. संजय बानखेडे, पोशि. निलेश नुगुरवार, पोशि. अनुप नाईक चानापोशि. प्रशांत मोहीजे यांनी कामगीरी केली.