धक्कादायक  स्वतःचा चिमुकल्या मुलाला विहिरीत फेकून केली हत्या

 

प्रतिनिधी // उमंग शुक्ला

माया पांचाळ नावाच्या महिलेने आपल्या एकुलत्या एक मुलाला विहिरीतफेकून त्याची हत्या केल्याची घटना लातुरात घडली आहे. वेंकट पांचाळ

असे पित्याचे नाव असून, दोन वर्षीय चिमुकला कुठे आहे ? असे कंपनीतून

आल्यावर त्याने विचारल्यावर तिने “त्याला विहिरीत फेकले” अशी कबुली दिली. हे उत्तर ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी महिलेची मानसिक स्थिती बरी नसल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं आहे. मुलाच्या हत्येनंतरही काही काळ ती विहिरीजवळच बसून होती. कुटुंबातील सदस्यांनी सांगितल्यानुसार ती आणि पती वेंकट यांच्यात अनेक वेळा लहान मोठ्या कारणांवरुन वाद विवाद व्हायचे. दाम्पत्यातील सततची भांडणं हेसुद्धा मुलाच्या हत्येमागील एक कारण असू शकतं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

माया आणि वेंकट यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती. त्यांना दोन वर्षांचा एकुलता एक मुलगा होता. हत्येच्या घटनेच्या आठ दिवस आधी माया आणि वेकट या दोघा पती-पत्नींमध्ये आपापसात मारामारी झाल्याचंही सांगितलं जातं. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.