११डिसेंबर  २०२१ रोज होणाऱ्या आर्वी येथील राष्ट्रीय लोकअदालत मध्ये पक्षकारांसाठी सहभाग घ्यावा…. मा. न्यायाधिश श्रीमती टि.एस गायगोले 

.
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच  विधी सेवा प्राधिकरण वर्धा व जिल्हा न्यायालय वर्धा  यांच्या निर्देशानुसार आर्वी येथील न्यायालयात  ११ डिसेंबर २०२१ शनिवार रोजी सकाळी १०:३० वाजता मा.टि.एस. गायगोले मॅडम   दिवाणी  न्यायाधिश ‘ क’ स्तर ,तथा न्यायदंडाधिकारी आर्वी व अध्यक्ष  तालुका विधी सेवा समिती आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, तरी या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रलंबित  प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी पक्षकार व जनतेने सहभाग घ्यावा असे आवाहन मा. न्या. टि.एस. गायगोले मॅडम यांनी केले आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व  मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार आर्वी न्यायालयात  दि.११ डिसेंबर  २०२१ शनिवार रोजी  राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन  मा. न्या.  टि.एस. गायगोले मॅडम अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती आर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून यामध्ये सामाजिक सलोखा वाढीस लागावा व आपापसातील वादविवाद हे तडजोडीने मिळवण्यासाठी न्यायालयातील दाखल पूर्व व प्रलंबित दिवाणी व तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर  लोकअदालत मध्ये  न्यायालयातील प्रलंबित दिवाणी दावे, तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे , धनादेशाची प्रकरणे, बॅक कर्ज प्रकरणे,  ग्रामपंचयात/नगरपंचायतीची थकबाकी प्रकरणे, दूरध्वनी बिले आदी दाखल पूर्व प्रकरणे हे सामोपचाराने मिटविण्यात येणार आहेत, तरी आर्वी तालूक्यातील पक्षकारांनी व विविज्ञांनी हि राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आर्वी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मा.न्या. टि.एस. गायगोले मॅडम व अध्यक्ष तालुका  विधी सेवा समिती आर्वी यांनी केले आहे.