बकऱ्या चोरणारी नागपूरची टोळी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्या जाळ्यात जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील 06 गुन्हे उघड

 

 

 

वर्धा जिल्यामध्ये काही दिवसापासून बकऱ्या चोरी चे प्रमाण वाढत असल्याने पोलीस अधीक्षक सा यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत निर्देश दिले होते. त्या अनुषंघाने मुखबीर लावण्यात आले होते. दरम्यान दि.05/12/2021 रोजी मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, काही इसम चारचाकी वाहनाने अंदोरी मार्गे बकऱ्या चोरुन नागपूरकडे जात आहे.अशा माहितीवरून तात्काळ नागपूर कडे रवाना झाले त्यानुसार आरोपी तसेच वाहनाचा शोध घेतला असता आरोपी हे पो.स्टे राळेगांव जिल्हा यवतमाळ येथील चोरलेल्या 3 बकऱ्या खाटीक प्रकाश उर्फ भुऱ्या माहुरे रा. नागपूर यांना विकत व विकत घेताना रंगेहात पकडले आरोपीतांची जागेवरच कसून चौकशी केली असता आरोपी यांनी वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात बकऱ्या चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने वर्धा जिल्ह्यातील 05 गुन्हे व यवतमाळ जिल्ह्यातील 01गुन्हा उघडकीस आणून त्याच्या ताब्यातून जु कि 10,60,000/- रु चा मुद्देमाल जप्त करून आरोपीस मुद्देमालासह पुढील कार्यवाहीकामी पो.स्टे देवळी यांच्या ताब्यात दिले.
सदर आरोपी यांनी अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिल्यात सुद्धा बकरी चोरी चे गुन्हे केल्याची कबुली दिली.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक वर्धा श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड, सपोनि. महेंद्र इंगळे यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि. सौरभ घरडे, पोलीस अंमलदार नरेंद्र डहाके, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, पवन पन्नासे, प्रदीप वाघ, नितीन इटकरे, अमोल ढोबळे, सायबर सेल चे दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार यांनी केली