दादोजी कोंडदेव स्टेडियम चे नूतनीकरण विजय हजारे ट्रॉफी चा सामना रंगणार  

 

 

ठाणे शहराचा मानबिंदू असलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नुतनीकरण ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले असून नव्याने तयार करण्यात आलेल्या या स्टेडियममध्ये विजय हजारे ट्रॉफी चा सामना रंगणार आहे….

तब्बल ३५ वर्षांनी या स्टेडियममध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटचा सामना रंगणार असल्याचा विशेष आनंद एक ठाणेकर म्हणून मला आहे असे नमूद करित हा सामना ठाण्यात व्हावा यासाठी प्रयत्न करणारे मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष श्री.मिलिंद नार्वेकर यांचा यासमयी विशेष सन्मान केला.

आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार करण्यासाठी योगदान देणारे नदीम मेमन यांनाही याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. यासमयी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना या स्टेडियम मधील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे स्पष्ट केले.

याप्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.बिपीन शर्मा, उप महापौर सौ.पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेवक विकास रेपाळे, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती प्रियांका पाटील, अतिरिक्त आयुक्त संजय हरवाडे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.