सदर गुन्हयाची थोडक्यात हकीगत याप्रमाणे आहे की, यातील फिर्यादी याने आपले मालकीचे मोटर सायकल क्र एम एच 32 एल 3984 स्पेलंडर प्लस ही आपले राहते घरासमोर उभी केली असता कोणीतरी अज्ञात इसमाने यातील मोटर सायकल क्र एम एच 32 एल 3984 स्पेलंडर प्लस की 30,000 रुपये दिनांक 02/12/2021 ते दिनांक 03/12/2021 चे रात्र दरम्याण चोरुन नेली. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टेला अप क्र 0981/21 कलम 379 भा.द.वी प्रमाने गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदर गुन्ह्याचे तपास दरम्याण मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरुन माहीती मिळाली की, सदर गुन्ह्यामधे चोरी गेलेली वर्णनाची मोटर सायकल आरोपी नामे अभीषेक निर्गुन वाणे वय 20 वर्ष रा. टाकरखेडा ता. आर्वी जिल्हा वर्धा याचे जवळ दिसल्याची माहीती मिळाल्याने नमुद आरोपी यास पोस्टेला आनुन विश्वासात घेउन विचारपुस केली असता सदर गुन्ह्यामधे चोरी गेलेली मोटर सायकल मी दि. 02/12/2021 ते दि. 03/12/2021 चे रात्र दरम्याण मोटर सायकल क्र एम एच 32 एल 3984 स्पेलंडर प्लस चोरुन नेल्याचे त्याने त्याचे बयाणात सांगीतल्याने सदर आरोपीस कायदेशीर रीत्या अटक करुन चोरीस गेलेली मोटर सायकल पंचासमक्ष कबुली निवेदन पंचनामा प्रमाने एम एच 32 एल 3984 स्पेलंडर प्लस कीमंत 30,000 रुपयेचा माल जप्त करण्यात आला. व सदर आरोपी यास मा. न्यायालयामधे एम. सी. आर वर रवाना करण्यात आले.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री यशवंत सोळंखे साहेब, मा. उप.वि.पोलीस अधीकारी सुनिल सोळखे साहेब यांचे मार्गदर्शनात पोनी. भाणुदास पिदुरकर साहेब यांचे निर्देशाप्रमाने गुन्हे शोध पथकाचे रणजीत जाधव, अनिल वैद्य, सुनिल मळनकर, सतिश नंदागवळी, प्रदिप दातारकर सैनिक, मोहन यांनी केली.