तिवसा शहर काँग्रेस कार्यकारिणीची निवड विविध संघटनांच्या युवकांचा शहर काँग्रेसमध्ये प्रवेश

 

मतांच्या ध्रुवीकरणासाठी काही राजकीय पक्ष जातीय तेढ अथवा धार्मिक विद्वेष पसरवण्याचे काम करतात हे नुकतेच निदर्शनास आले आहे. मात्र अशा भूलथापांना बळी न पडता संवेदनशील युवक काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवत आहेत. याचाच प्रत्यय आज अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात आला. तिवसा शहरातील विविध संघटनांच्या अनेक युवकांनी आज जिल्ह्याच्या पालकमंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शहर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी तिवसा शहर काँग्रेस कार्यकारिणीची निवड ही राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तिवसा शहर काँग्रेस अध्यक्षपदी श्रीराम उर्फ सेतु देशमुख तर तिवसा शहर कार्याध्यक्षपदी सुनील बाखडे यांची निवड करण्यात आली आहे. तर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी धीरज ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेवर आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवत आदेश सोनटक्के, संजय वानखडे, कपिल अग्रवाल, तुषार लेवटे, शुभम मनोहरे, अभी बावणे, गोलू काझी, लोकेश लोणारे आणि अमोल डोंगरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ना.यशोमती ठाकूर, जिल्हा सहकारी बँकेचे उपाद्यक्ष सुरेशराव साबळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मुकुंद देशमुख, , माजी नगराध्यक्ष वैभव स.वानखडे, माजी जि प सभापती दिलिपराव काळबांडे, तालुका काँग्रेस कार्याद्यक्ष सतिश पारधी,रुपाली काळे, सागर राऊत,अजिम शहा, आनंद शर्मा उपस्थित होते