नगरपंचायतीचे नगरसेवक व समुद्रपूर बुरकोनी येथील अनेक कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात प्रवेश

 

दिनांक…06-12-2021

ग्रामपंचायत सदस्य ते नगरसेवक असा आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर आणि कर्तृत्वाच्या जोरावर धगधगत पार करणारे. युवा नेतृत्व श्री.आशिषभाऊ अँड्रस्कर व विजय निगोट तसेच भुरकुन येथील नरेशराव थुल व अरुणराव ताकसांडे यांनी आज दिनांक 06-12-2021ला भारतीय जनता पक्षाच्या कार्याला व कार्यसम्राट आमदार श्री.समीरभाऊ कुणावार यांच्या विकासाभिमुख राजकारणाने प्रभावित होऊन नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करून भारतीय जनता पक्षाचा झेंडा मा. कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या नेतृत्वात हाती घेतला. यावेळी भुपेंद्रजी शहाणे जिल्हा कोषाध्यक्ष, अंकुश ठाकूर भा ज यु मो प्रदेश सचिव , तालुका अध्यक्ष संजय डेहणे , माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, भुजंगराव अंड्रस्कर , पांडुरंगजी बाभूळकर विठ्ठलराव झाडे , भाजयुमो शहर अध्यक्ष सोनू पांडे, कवीश्वर इंगोले, कमलाकर आस्कर, सुनीलभाऊ रोकडे, सतीश ठाकरे , सतीश भाऊ बेताल, संदीपजी चाफले ,बालू रोठे, घनश्याम येरलेकर इत्यादी- असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.