आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या उपस्थितीत सुमित मनोहरलाल आहुजा यांचा भाजपा मध्ये प्रवेश

भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाची बैठक भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय हिंगणघाट येथे पार पडली.
बैठकीमध्ये युवा वारीअर्स, भाजयुमो कार्यकारिणी तसेत समोरील काळात येणाऱ्या नगरपालिका निवडणुका याविषयी संघटनात्मक चर्चा करण्यात आली. येत्या काही दिवसांमध्ये युवा वारीअर्स च्या शाखा उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार समिरभाऊ कुणावार, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर भाऊ दिघे, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, भाजपा जिल्हा सचिव सुभाष कुंटेवार, भाजपा अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष बिस्मिल्ला खान, भाजपा शहराध्यक्ष आशिष पर्बत, युवा मोर्चा शहराध्यक्ष सोनू पांडे, स्टार प्रचारक राकेश शर्मा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ची मिटिंग संपन्न झाली सदर मिटिंग मध्ये हिंगणघाट शहरातील नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजपा चे सक्रिय कार्यकर्ते सोबतच युवा मोर्चा चे पदाधिकारी व सक्रीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
सोबतच हिंगणघाट शहरातील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ता सुमित मनोहरलाल आहुजा यांचा आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपा मध्ये भव्य प्रवेश करण्यात आला सोबतच त्यांचा सत्कार करण्यात आला सुमित अहुजा हे भारतीय जनता पार्टीचे हिंगणघाट शहरातील प्रमुख कार्यकर्ता आहे.