बॅग लिफ्टिंग व जबरी चोरी करणारी आंतरराज्यीय अट्टल गुन्हेगारांची कुख्यात टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

सविस्तर वृत्त असे की

सौ. डार्थी रुपेश मून, रा. कवठा (रेल्वे), जि. वर्धा यांनी त्यांचे नातेवाईकासह स्टेट बँक पुलगाव येथून पैसे काढून नातेवाईकास बस मध्ये बसवीत असताना हातात असलेल्या प्लास्टिक पन्नी ज्यामध्ये ५० हजार रुपये व कागदपत्रे होती ती प्लास्टिक पन्नी दोन अनोळखी इसमानी बाईकवर येऊन जबरीने हिसकावून चोरून नेली अश्या रिपोर्टवरून पो.स्टे. पुलगाव येथे अप.क्र. १०५०/२०२१ कलम ३९२, ३४ भा.दं.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
अशाच प्रकारचे गुन्हे वर्धा जिल्यातील हिंगणघाट, आष्टी व राज्यात अनेक ठिकाणी होत असल्याने सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक यांनी स्वतः सायबर शाखेत हजर राहून तांत्रिक बाबींची पडताळणी केली व स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश देवून पथक पाचरण केले व सदर पथकास सूचना व मार्गदर्शन केले. अनेक ठिकाणी अशाप्रकारचे गुन्हे होत असल्याने सर्व ठिकाणी समन्वय साधून या गुन्हेगारांबाबत अधिक माहिती गोळा करण्यात आली व अश्या प्रकारची टोळी ही परभणी येथील दर्गा परिसरात वास्तव्य करीत आहे अशी विश्वसनीय माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक परभणी येथे पाठविण्यात आले. सदर पथकाने सदर टोळीचा कस्सून शोध घेतला व १) आनंद शेखर नायडू, वय ३५ वर्ष, रा. अंबरनाथ, २) शिवा मलया शेट्टी, वय ३५ वर्ष, रा. शिमग्गा कर्नाटक, ३) दुर्गप्पा बाबू सातपाडी, वय ३२ वर्ष, रा. शिमग्गा कर्नाटक, ४) सनमुगम सुब्रमण्यम, वय ५८ वर्ष, रा. मदुराई तामिळनाडू, ५) शेखर साई बाई, वय १८ वर्ष, रा. चिखलठाणा, औरंगाबाद, ६) उदय बाबू देवाम्मा, वय १८ वर्ष, रा अंबरनाथ, मुंबई यांना मोठ्या शिताफिने ताब्यात घेऊन त्यांना पोलीसी हिसका दाखवला असता आरोपींनी इतर साथीदाराचे मदतीने सदर गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडून १) एक काचकूरी पावडर ५०० ग्राम, २) एक लोखंडी सुरा, ३) दोन नग पेचकच, ४) चार नग टोचे (टायर पंचर), ५) दोन नग गुल्लर (एक प्लास्टिक एक लाकडी), ६) दोन मेहंदीचे पॉकेट (रेशम), ७) एक नग कटर, ८) एक नग पांढऱ्या रंगाची पॉवर बँक (MI कंपनीचे), ९) सात नग गाड्याच्या चाब्या, १०) हवा सोडण्याची कि, ११) दोन नग पांढऱ्या रंगाची, १२) एक काळ्या रंगाचा नोकिया कंपनीचा साधा मोबाईल, १३) एक काळ्या रंगाचा लावा कंपनीचा साधा मोबाईल, १४) एक गोल्डन रंगाचा खीहादा कंपनीचा मोबाईल, १५) एक टेक्नो स्पार्क कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, १६) एक जियोनी कंपनीचा गोल्डन रंगाचा अँड्रॉइड मोबाईल, १७) एक विवो कंपनीचा आकाशी रंगाचा अँड्रॉइड मोबाईल, १८) नगदी ४९००/- रुपये असा माल जप्त करून पोस्टे पुलगाव यांचे ताब्यात देवून वर नमूद गुन्हा उघडकीस आणला. सदर टोळीकडून अश्या प्रकारचे अनेक गुन्हे संपूर्ण राज्यात उघड होण्याची शक्यता आहे. आरोपी अटक करण्याकरिता परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सहकार्य केले.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री. संजय गायकवाड, स्था.गु. शा. वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि. सौरभ घरडे, पोउपनि. बाबू मुंडे, पो.स्टे. हिंगणघाट, पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, स्वप्नील भारद्वाज, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टणकर, नवनाथ मुंडे व पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पोलीस अंमलदार विवेक बनसोड, पंकज घोडे तसेच सायबर शाखेतील पोलीस अंमलदार दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राउत, अंकित जीभे, महिला पोलीस अंमलदार शाहीन सय्यद, स्मिता महाजन यांनी केली.