प्रतिनिधी // धीरज कसारे
कारंजा (घा):- कारंजा येथील धडाडीच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या सौ. ज्योतीताई गंगाधररावजी यावले यांनी आर्वी विधानसभेचे आमदार दादारावजी केचे व माजी सरपंच शिरीषजी भांगे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होत भारतीय जनता पक्षामद्ये आमदार विकासपुरुष दादारावजी केचे व माजी माजी सभापती शिवाजीराव खवशी यांच्या उपस्थिती मद्ये प्रवेश केला व ज्योतीताई यावले यांना नियुक्ती पत्र देवुन त्यांची कारंजा शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली..
प्रवेश करतेवेळी यावले यांनी सांगीतले की आर्वी विधानसभेचे आमदार दादारावजी केचे यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील मोठया प्रमाणात विकास साध्य केला आहे. याउलट मागील पाच वर्षापासून कारंजा नगर पंचायत वर काँग्रेस ची सत्ता असताना काँग्रेस च्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात करण्यात आलेल्या घोटाळ्यांना कंटाळून तसेच काँग्रेस च्या नेतृत्वाने कारंजा शहराला विकासापासून कोसो दूर ठेवत, मतदानाच्या वेळी भूलथापा देवून गावाची दिशाभूल करत मतपेट्या पुरताच विचार केला त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्याकरिता आपण आज भाजपा मद्ये प्रवेश करीत असल्याचे सांगीतले..
प्रवेश करतेवेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिरीषजी भांगे, तालुका अध्यक्ष मुकुंदाजी बारंगे, माजी सभापती मंगेशजी खवशी, माजी ग्राम पंचायत सदस्य सुरेंद्रजी यावले,शहर अध्यक्ष दिलीप जसुतकर, माजी नगरसेवक संजयजी कदम, राजूभाऊ वंजारी, अनिलजी वंजारी, सुदीपजी भांगे, राजूभाऊ डोंगरे, किशोरजी भांगे, युवा मोर्चा चे मंगेश सिडाम, वेदांत घिमे, राणा बावरी, आकाश मानकर, राहूल भांगे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योतीताई यावले यांचे सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..