भाजप, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांची शिवशेनेत जाहीर प्रवेश
पालघर जिल्ह्यातील मोखाडा व तलासरी विभागांतील भाजपा आणि बहुजन_विकास_आघाडी पक्षांतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
तलासरी नगरपंचायतीतील भाजप नगरसेवक आशिर्वाद रिंजड, भाजप नगरसेविका सौ.रिजवाना खाटीक, उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य दुर्गाप्रसाद (पप्पू) यादव, भाजपचे पालघर जिल्ह्याचे युवा चिटणीस मेहुल महाले, भाजपचे सदस्य संदीप वरखंडे, भाजप सदस्य राजेश डोंबरे, बहुजन विकास आघाडीचे मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती नवसो सोमा दिखा आणि सामाजिक कार्यकर्ते ढवळू धोडगा यांनी हातात भगवा झेंडा घेत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्ह्यात शिवसेनेला बळकटी देऊन पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी या सगळ्यांनी दर्शवली.
यावेळी आमदार आणि पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक उपस्थित होते.