प्र 3 येथे भाजयुमो युवा वॉरियर्स शाखा उदघाटन सोहळा.

 

भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा जिल्हा अध्यक्ष वरुण पाठक यांच्या व नेतृत्वात व वर्धा विधानसभेचे आमदार श्री पंकज भोयर, यांच्या हस्ते व भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजपा संघटन महामंत्री अविनाश देव, नगराध्यक्ष अतुल तराळे,जयंत कावळे, प्रशांत बुर्ले, वीरू पांडे,गौरव गावंडे, वैभव तिजारे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये गोंड प्लॉट प्र.3 येथे भाजयुमो युवा वॉरियर्स शाखा उदघाटन सोहळा संपन्न झाला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून १८ ते २५ वयोगटातील युवाकांचा राजकारणात सहभाग वाढावा,युवकांच्या कलागुणांना वाव मिळावा,व त्यांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी युवा वॉरियर्स अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे.सामान्य परिवारातील, मात्र संधी मिळाली नाही, जुन्या पिढीतील निष्ठावान परिवारातील मुले अशा सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करावा संघटनेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना आपण सामावून घ्यावे.असे आव्हाहन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केले.यावेळी हेमंत एलचटवार यांची शाखा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्ष पदावर पवण सूर्यवंशी,चंद्रकांत सरांह, सरचिटणीस सुरज कोकाटे,सहसचिव विकास काळे, यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी बादल झामरे,कुणाल दूरतकर,आकाश घोडमारे, नितेश कोर्टेकर, रवि खंडारे,उमेश कांबळे,नयन नवराते,यश बांते,अक्षय कांबळे, अनिल डोंगरे, आकाश झामरे, अमित तेलंग, अजय बावणे,अंकुश सूर्यवंशी,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते..