राजकीय हस्तक्षेपामुळे  येथील PHC समोरील रोडचे काम स्थगीत

 

कारंजा तालुका प्रतिनिधी//धीरज कसारे

जिल्हा परिषद अध्यक्ष सरिताताई गाखरे यांनी नारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आणि पाहणी केली असता त्या दरम्यान त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रा समोरील रस्त्याची दुरवस्था बघुन अध्यक्ष यांनी उपविभागीय अभियंता पेधे व कनिष्ठ अभियंता दौलतकर यांना विचारणा केली

असता दौलतकर यांनी सांगितले की ग्रामपंचायतने NOC न दिल्यामुळे व पंचायत समिती सदस्य नारा यांनी राजकीय क्षेय घेण्याकरिता या रस्त्यांचे काम आम्ही करु असे सांगून या रस्त्यांचे काम प्रलंबित करण्यात आले

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार , आरोग्य शिक्षण सभापती मृणाजल माटे , जिल्हा परिषद सदस्य गजाम , युवराज गिऱ्हाळे , मोहन खवशी , मेघराज खवशी , अनिल मंजूळकर , विष्णू धंडाळे उपस्थित होते