
बुलढाणा::शैक्षणिक कर्ज देत नसाल, तर आत्महत्येची परवानगी द्या अन्यथा नक्षलवादी बनणार अश्या शब्दात मजकूर लिहत मुख्यमंत्री ठाकरे यांना त्या युवकाने पत्र लिहल.
हे पत्र बुलढाण्यातल्या फार्मसीचे शिक्षण करणाऱ्या वैभव बाबाराव माणखैर याने ते पत्र लिहल आहे.
हा विद्यार्थी संग्रामपूर तालुक्यातील काकोडा गावात राहतो, वडिलांनी शेतीसाठी घेतलेलं कर्ज फेडल नाही म्हणून वैभवच शैक्षणिक कर्ज बँकेने नाकारले, पैशाअभावी वैभव पूर्णपणे खचून गेला आहे, पुढचं शिक्षण कस होणार असा प्रश्न त्याच्यासमोर उभा आहे, या बोगस सिस्टमच कंबरडे मी एक उत्कृष्ट नक्षलवादी बनून मोडेल, वैभवने पुढच्या शिक्षणासाठी बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता, मागील चार महिन्यापासून त्याने बँकेच्या पायऱ्या चढल्या पण बँकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
काही दिवसानी बँकेने त्याच्या हाती रिजेक्शन लेटर पाठविले त्यामध्ये तुमच्या वडिलांनी जून कर्ज फेडले नसल्याने आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही असा त्या लेटरमध्ये उल्लेख होता. बँक कर्ज नाकारलं हे सांगण्यासाठी बँकेला 4 महिने का लागले असावे असा प्रश्न सुद्धा यावेळी उपस्थित झाला आहे, वैभव पुढचे शिक्षण घेत काही व्यवसाय किंवा नोकरी करू शकला असता व वडीलांचे कर्ज सुद्धा त्याने फेडले असते मात्र तसे न करता बँकेने त्याचा अर्ज फेटाळून लावला.
यामुळे नैराश्यात आलेल्या वैभवने टोकाचा निर्णय घेत थेट मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहत खळबळ माजवली